न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात आरोग्य मित्र व रुग्ण मित्र म्हणून लौकिक प्राप्त केलेले सामाजिक कार्यकर्ते स्वानंद राजपाठक यांचे वडील विजयकुमार राजपाठक यांचे (दि. २०) रोजी दुःखद निधन झाले. कै. विजयकुमार राजपाठक यांच्या दशक्रिया विधी निमित्त स्वानंद राजपाठक यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून आपल्या पित्याच्या सामाजिक योगदानाला समाजद्रष्टे ॠणदायित्व पार पाडले आहे.
या शिबिरास आनंद ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या माध्यमातून रविवारी हे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी ५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली श्रद्धांजली अर्पण केली.
या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक शितल शिंदे यांनी केले. यावेळी यशवंतराव चव्हाण रक्तपेढीचे डॉ. शंकर मोसलगी, ब्लड बँकेचे कौन्सिलर सुनित आवाटे, डॉ राज शिनकर, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, रवींद्र कुलकर्णी, माधव जोशी, नरसिंह पाडुळकर सौ. प्रिया जोशी, अशोक नागणे, दिलीप पाटणकर, रवींद्र झेंडे, श्याम ब्रह्मे, प्रदीप वळसनकर, पंकज देशमुख, मयुरेश जोशी, पुनम गुजर, शशिकांत पानट आदी प्रमुख उपस्थित होते.















