- स्वच्छता अभियानास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२३) :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर परिसरात आज सोमवारी (दि. २) रोजी विधायक उपक्रम राबविण्यात आला. ‘स्वच्छता हीच सेवा’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत ‘एक तास स्वच्छते’साठी या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून पिंपळे सौदागर परिसर चकाचक करण्यात आला. प्रारंभी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. या अभियानात पाचशे नागरिकांनी सहभाग घेतला. जमा झालेल्या कचऱ्याची महापालिकेच्या माध्यमातून विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख मनोज ब्राह्मणकर, उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा महिला मोर्चाच्या चिंचवड विधानसभा अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजयशेठ भिसे, पिके स्कुलचे संस्थापक जग्गनाथ काटे, समाजसेवक वाल्मिक कुटे, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जसवाल, डॉ. अवताडे मॅडम, विजय भांगरे विठाई वाचनालयचे सर्व सभासद, आनंद हास्य क्लब चे सर्व सभासद, ऑल सिनियर सिटीजन असोसिएशन चे सर्व सभासद व परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.
देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत श्रमदान केले जात आहे. याच अनुषंगाने उन्नतीच्या वतीने आज सकाळी १० ते ११ या वेळेत एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शहराला कचरामुक्त करून स्वच्छ सुंदर बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे सौदागरला आणखी स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या दृष्टीकोनातून उन्नती सोशल फाऊंडेशन सतत प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्व पिंपळे सौदागरवासियांचा मोठा सहभाग लाभत आहे. तसेच आजच्या स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानते, असे मत डॉ. कुंदाताई भिसे यांनी व्यक्त केले.
सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.















