- भाजपच्या अमित गोरखेंकडून उपक्रमाचे विशेष कौतुक अनं आभार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२३) :- संभाजीनगर-शाहूनगर येथील बेस्ट फ्रेंड फाउंडेशनच्या वतीने तरुणांनी एकत्र येऊन शिव-शाहू-शंभो गार्डनची स्वच्छता स्वयंस्फूर्तीने केली. यामध्ये हातात झाडू, खराटे घेऊन सकाळी सहा वाजता संपूर्ण गार्डन व जवळचा परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वयंस्पर्तीने केलेल्या कामाचे कौतुक भाजपचे नेते अमित गोरखे व नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी केले आहे.
अमित गोरखे म्हणाले, अशा प्रकारची स्वच्छता ही खऱ्या अर्थाने सर्वांनी कायम केली पाहिजे. बेस्ट फ्रेंड्स फाउंडेशनने केलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
या अभियानामध्ये शाहूनगर, संभाजीनगर HDFC कॉलनीतील हरिभाऊ वलोकर (मामा), रावसाहेब ढोकळे, अमित तनवर, लक्किसिंग अरोरा, संजय कौशिक, उदय दुंडगे, संतोष पोळ, योगेश ग्रामोपाध्याय, लोखंडे, तात्यासाहेब तापकीर, निलेश चौहान, संकेत लोंढे, डॉ. संजीव लोंढे, नानासाहेब नलवडे, सचिन पवार, जोशिकाका, रमेश नागराज, मिलिंद कुलकर्णी, चौहान ठाकूर, दीपक सोमाणी यांनी सहभाग नोंदवला.
त्या सर्वाचे कौतुक करण्यात आले.















