न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२३) :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिम्मित सोमनाथ तापकीर युवा मंच आणि ओम साई ग्रुपच्या वतीने तापकीर मळा चौकात आज सोमवारी सकाळी ९ ते १० या दरम्यान ‘एक तास श्रमदानातून स्वछता मोहीम राबविण्यात आली. त्याद्वारे सामाजिक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी सर्व महिला सफाई कामगारांना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पुरुष सफाई कर्मचाऱ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी बबलू शेख, अजीम पठाण, कयूम शेख, राजू शिंदे, काशीनाथ काटे, किशोर लोणकर, बालाजी कांबळे,राजू घोलप, स्वप्नील रोंगे, भैय्यासाहेब कांबळे, अनिल नाथानी, केतन पडवळ, नितीन मोटे, तुषार पाटील, मोहन चव्हाण, शिवा फुलारे, नंदन तायडे, प्रज्वल मोहिते, बसू बिरादार, महेश बिरादार, सुमित हाडळ, प्रसाद कदम, गणेश यादव, शुभम शिंदे, योगेश साळुंखे, हिराशेठ चौधरी, संतोष आहिरे, मछिंद्र शिंदे, अनिल पाटील, माधव हुकमते व ओम साई ग्रुपचे सर्व सभासद या मोहीमेत सहभागी झाले होते.















