न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२३) :- गांधी जयंती आणि लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या सेवा सप्ताहाचे औचित्य साधून, लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्ड यांच्या वतीने आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसर व इंद्रायणी घाटाची स्वच्छता करण्यात आली.
स्वछता कर्मचाऱ्यांचा क्लबच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. स्वच्छता अभियानात क्लबचे माजी अध्यक्ष ला. जयश्री साठे, ला. दिपाली कुळकर्णी, ला. अरुण इंगळे, ला. संगीता इंगळे, ला. मुकुंद आवटे, ला. विठ्ठल खेसे, ला. प्रशांत गदिया, ला. दिगंबर ढोकले, ला. शंकर देवरे, सचिव ला. प्रशांत शर्मा, ला. तृप्ती शर्मा, खजिनदार ला. संदीप वाळुंज, अध्यक्ष ला. डॉ शंकर गायकवाड, लिओ सदस्य अद्वेत साबळे, लिओ अथर्व कुलकर्णी व इंद्रायणी व्होकेशनल कॉलेजचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.















