न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी आणि भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक आरोग्य अधिकारी विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.















