- भोगावी लागली जेलवारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२३) :- रहाटणीतील जय भवानी चौक येथील बेस्ट बेकरी येथे रविवारी (दि. ०१) रोजी ८:३० च्या सुमारास आलेल्या टोळक्याने ” तुझे बहुत चरबी है क्या, हमने बोला था ना की, हम रहाटणी के भाई हैं, हमे हफ्ता देना पड़ेगा, हम कल फिर आयेंगे, हफ्ता नही दिया तो काट डालेंगे” अशी धमकी बेकरीत काम करणाऱ्या फिर्यादीला दिली.
त्याना शिवीगाळ करुन त्याच्याकडे आरोपींनी हफ्त्यापोटी दोन हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने त्याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीला जिवे ठार मारण्याचे इराद्याने वार केला. फिर्यादीने तो वार चुकविला. ते पाहून तेथील इतर ग्राहक भितीने पळून गेले. आरोपी यांनी फिर्यादीची कॉलर पकडुन कानाखाली मारली. बेकरीमधील साहित्याचे नुकसान केले. त्यानंतर बाहेर मोठमोठ्याने आरडा ओरडा करीत हातातील कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण केली.
रस्त्यावरील लोक त्यांच्या दहशतीने घाबरून पळून गेली. याप्रकरणी मो. उजैका अब्दुल मलिक अन्सारी (वय २० वर्षे, रा. रहाटणी) याने आरोपी १) पवन शहादेव जाधव (वय २१ वर्षे, रा. श्रीनगर, रहाटणी), २) रोहीत राहुल शिंदे (वय १९ वर्षे, रा. रहाटणी), ३) माऊली ऊपाले (अंदाजे वय २० वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ९५२ / २०२३ भा.द.वि. कलम ३०८, ३८७, ४२७, ५०४, ३२३, ५०६, ३४ क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्ट ३, ७ आर्म अॅक्ट कलम ४, २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी क्र १ व २ अटकेत आहेत. सपोनि पाटील पुढील तपास करीत आहेत.