न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२३) :- काळेवाडीतील तापकीर चौकातुन फिर्यादी त्यांच्या आईसह दुचाकीवरून रस्त्याने जात होते. दरम्यान काळेवाडी येथे पाठीमागुन आलेल्या टाटा कंटेनर ट्रकने फिर्यादीच्या दुचाकीला पाठीमागुन धडक दिली. त्यामुळे फिर्यादीची आई रस्त्यावर खाली पडली.
क्षणार्धात ट्रकचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या जखमी झाल्या. अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला आरोपी कंटेनर चालक कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. सोमवारी (दि. ०२) रोजी दुपारी ४.२० च्या सुमारास हा अपघात घडला.
फिर्यादी विजय राजु हार्दे यांनी आरोपी शाहरूद्दीन हारून (वय २२ वर्षे रा. उत्तरप्रदेश) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस ठाण्यात पोलिसांनी ९५३/२०२३ भादवि कलम २७९,३३८, ३०४ (अ) मो.वा.का. कलम १८४, ११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मासाळ पुढील तपास करीत आहेत.