न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२३) :- ”गेल्या दीड-दोन महिन्यापुर्वी सिराज व माझ्यामध्ये कंपनीचे भंगार घेण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी सिराजने मला दमदाटी करून कुदळवाडी परिसरात राहणाऱ्या मुलांना मारहाण करण्यासाठी पाठविले होते. त्यामुळे भविष्यात माझ्या जीवाला धोका होऊ शकतो यामुळे मी माझ्या ओळखीचा मुंबई येथे राहणारा मोहम्मद अनिस यास फोन करून बोलावून घेतले. (दि. २८/०९/२०२३) सायं. ६ च्या सुमारास सिराज यास कुदळवाडी येथून जबरदस्तीने भंगार घेण्याचे खोटे कारण सांगून मोटरसायकलवर बसूवून च-होलीकडून डी. वाय. पाटीलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पश्चीम बाजूस असणाऱ्या मिलीटरीच्या ताब्यात असणाऱ्या जंगलात नेले. त्याच्या डोक्यात हातोडीने घाव करून त्याचा खुन केला व मृतदेह जंगलात टाकला”, अशी आरोपींनि कबुली दिली.
चिखली पोलीस स्टेशनमध्ये (दि. ३०/०९/२०२३) रोजी सिराज अबुल हसन खान (धंदा-भंगार व्यवसाय, गट क्र. १६, कमाल वजनकाट्यासमोर, कुदळवाडी) हा (दि. २८/०९/२०२३) या दिवशी बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा चुलता मिजाज अहमद अब्दुल हसन खान याने दिली होती. त्याअनुषंगाने चिखली पोलीस स्टेशन मनुष्य मिसिंग रजिस्टर 200/2023 अशी तक्रार नोंद झाल्याने मनुष्य मिसिंग व्यक्तीचा तपास चिखली पोलीसांनी सुरू केला होता. तपास दरम्यान वरील प्रकरणाचा खुलासा झाला.
चिखली पोलीसांचे तपास पथक तक्रारदारासह घटनास्थळी गेले. मिलिटरीच्या अंतर्गत भागात जंगल असल्याने घटनास्थळ शोधण्यास पोलीसांना ४ तास वेळ लागला. सततचा पडणारा पाऊस, दलदल यामुळे मृतदेह कुजला होता. व त्याची दुर्गंधी परिसरात सुटली होती. मृत सिराजच्या कपड्यावरून व बाह्य दिसण्यावरून तक्रारदाराने मृतदेह सिराजचा असल्याचे ओळखले. त्यामुळे तात्काळ चिखली पोलीसांनी सैफुद्दीन व मोहम्मद अनीस याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.
सुरुवातीला सैफुद्दीनला ताब्यात घेऊन त्याच्याकडे मोहम्मद अनीसबाबत विचारणा केली असता तो काही व्यवस्थित माहिती सांगत नव्हता. मोहम्मदला ताब्यात घेणे गरजेचे असल्याने ते चिखली पोलीसांसमोर मोठे आव्हान उभे होते. असे असताना चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक पिंजारी यांनी तांत्रिक विश्लेषण करून मोहम्मदचा फोन नंबर मिळवण्यात यश मिळवले. त्याआधारे मुंबईत जाऊन मोहम्मदला चिखली पोलीसांनी रितसर अटक केली. जर तात्काळ मोहम्मदला ताब्यात घेण्यात आले नसते तर तो उत्तर प्रदेशला पळुन जाण्याच्या तयारीत होता. खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाल्यानंतर अवघ्या २४ तासात दोन्ही आरोपींना चिखली पोलीसांनी ताब्यात घेतले.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, वसंत परदेशी अति. पोलीस आयुक्त, संदिप डोईफोडे पोलीस उप आयुक्त परीमंडळ ३, राजकुमार गोर सहा. पोलीस आयुक्त एमआयडीसी भोसरी विभाग व ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पो. नि. तौफिक सय्यद, पोलीस उपनिरीक्षक बारावकर, स. पो.फौ.ए.डी. मोरे, पो.हवा. ११०७ शिंदे, पो. हवा. ४७८ गर्जे, पो. हवा. ६७८ शिर्के, पो.हवा. २९६१ ताराळकर, पो. हवा.८०३ सि.डी. सावंत, पो.हवा. ११३३ साकोरे, पो.ना. *१८१३ सुतार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांनी केलेली आहे.