न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२३) :- ”मुद्रा फायनान्स MSME Ministry of Gov. India येथून बोलत आहे. तुम्हास मुद्रा योजनेतून लोन हवे आहे का?” अशी बतावणी आरोपीने मोबाईल द्वारे फिर्यादीशी संपर्क साधत केली. फिर्यादी यांना लोनची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या व्हाटसअप नंबरवर पॅनकार्ड, आधारकार्ड GST Certificate, तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट, दोन फोटो मागितले. फिर्यादीला वेळोवळी विविध कारणे सांगुन फिर्यादीकडुन ७,८२, ४३४ रूपये उकळले. फिर्यादीची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फसवणुकीचा हा प्रकार (दि ५ /०८/२०२३ रोजी ३.०९ वा. ते दि २९/०९/२०२३) वाजता घडला. फिर्यादी गोपिचंद देवराम काटे (रा. पुनावळे, रावेत) यांनी आरोपी अनोळखी इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी ३४९/२०२३ भादवि कलम ४२०,४०६ माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ सी अन्वये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोहवा बारकुले पुढील तपास करीत आहेत.












