न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२३) :- पिडीत दोन महिलांना वेश्या व्यवसायासाठी दोघांनी भाग पाडले. त्यांना पैशांचे अमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करीत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागवली.
याप्रकरणी पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाच्या गुन्हे शाखेने (दि. ५) रोजी सायंकाळी ५.३५ वाजेच्या सुमारास आर्यन लॉजिंग ॲन्ड बोडींग, रुम नं १०२, निघोजे ता. खेड येथे कारवाई करून १४,५५० रूपये किंमतीच्या मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली.
म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५९७/२०२३ भा.द.वि कलम ३७० (३), ३४ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५,७ नुसार मोहम्मद जाहीद नजीर हुसेन इदरीस (वय ३८ वर्षे रा. पिंपरी रेल्वे स्टेशन मागे, पिंपरी) याच्यावर आणि पाहिजे आरोपी प्रेम कोकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गायकवाड पुढील तपास करीत आहेत.












