न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२३) :- मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, देशातील काही भागातून तो परतला आहे. महाराष्ट्रातून देखील तो परतीच्या वाटेवर असून, शहरात ऑक्टोबर हिट जाणवत आहे तर मध्येच धुक्याची दुलई पसरत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता जाणवत आहे. त्यामुळे उकाड्याने आता नागरिक हैराण होऊ लागले आहेत. देशातील उत्तरेच्या काही भागातून मॉन्सून पूर्णपणे परतला आहे. तो हळूहळू महाराष्ट्रातूनही जाईल. मुंबई आणि पुण्यातून ६ किंवा ७ ऑक्टोबर दरम्यान मॉन्सून परतीच्या वाटेवर जाईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
त्यामुळे हवामान कोरडे राहणार असून, उकाडा जाणवणार आहे. दुपारचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. त्यामुळे नागरिकांना घाम फुटत आहे.













