न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२३) :- शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या चार दिवसांमध्येच सहा जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मलेरियासदृश्य आजाराच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होत असून, चार दिवसांमध्ये २ हजार ३८ रुग्णांमध्ये तीव्र थंडी-ताप आहे. तसेच मागील आठवड्यामध्ये सलग झालेल्या पावसामुळे तापाच्या रुग्णांमध्येदेखील वाढ झाली आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जुलै महिन्यापासून आतापर्यंत १५४ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर सहा जणांना मलेरिया झाला आहे. तसेच चिकनगुनियाने बाधित रुग्ण नसला तरी २३ रुग्णांमध्ये चिकनगुनियाची लक्षणे आढळली आहेत. रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे.
डास चावल्याने डेंग्यूचा आजार होतो. तसेच लक्षणे आढळल्यास तत्काळ मनपा दवाखाना व रुग्णालयामध्ये तपासणी करून घ्यावी. – डॉ. अभयचंद्र दादेवार, सहायक आरोग्य वैद्यकीय…












