- तब्बल 22 जणांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले..
- लागोपाठच्या दुसर्या दुर्घटनेमुळे शहरातील नागरिक भयभीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
(दि. 10 ऑक्टोबर 2023) :- कासारवाडीतील महापालिकेच्या जलतरण तलावात पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गॅसचा वापर केला जात असताना गॅसची टाकी आणि पाण्याचा संपर्क आला. त्यामुळे तलावात गॅस गळती सुरू झाली.
स्विमिंगसाठी आलेल्या नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. येथील नागरिक, जीवरक्षक, सुरक्षा रक्षक अशा तब्बल 22 जणांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी रुग्णालयात भेट देऊन दुर्घटनाग्रस्तांची विचारपूस केली. तसेच गॅस गळती कशी झाली याचा तपास करणार असल्याची माहिती दिली.
दरम्यान रविवारी ताथवडेत गॅस सिलेंडरच्या स्फोटांची मालिका आणि आज सकाळी झालेली गॅस गळती, अशा लागोपाठच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत.













