- कासारवाडीतील गॅस गळती दुर्घटनेतील नागरिकांची केली आस्थेने विचारपूस…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२३) :- कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरीन गॅसची गळती मंगळवारी झाली होती. त्यावेळी साधारण २० ते २५ नागरीक पोहण्यासाठी जलतरण तलावात गेले होते. क्लोरीन गॅसची गळती झाल्याचे लक्षात येताच नागरीकांनी मा. नगरसेविका आशा धायगुडे शेंडगे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्या घटनास्थळी दाखल झाल्या.
पालिकेचे अग्निशामक दल प्रमुख विजयकुमार थोरात, ह प्रभाग क्षेत्रीय प्रमुख उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त क्रिडा विभाग प्रमुख मिनीनाथ दंडवते आणि अति. आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि तातडीने मदतकार्य घटनास्थळी पोहोचले.
आशा शेंडगे म्हणाल्या, घटनेची मला माहिती मिळताच मी घटनास्थळी तातडीने पोहोचले. युवराज सोनवणे व अभिजीत कट्टे यांना सुचना करून त्रास होणाऱ्या नागरीक व जीवरक्षक यांना त्वरीत वाय. सी. एम. रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर जलतरण तलावात जावुन महीला आणि नागरीकांच्या बॅग त्यांच्या स्वाधीन करुन त्यांची घरी जाण्याची व्यवस्था केली. रेव्हु इस्टेट, सरीता गार्डन, ज्ञानराज विद्यालय येथे जावुन नागरीकांची विचारपुस केली. तसेच वाय. सी. एम. रूग्णालयात पालिकेचे अति. आयुक्त १ विजयकुमार खोराटे यांच्यासह वाय.सी.एम. रुग्णालयातील दाखल झालेल्या नागरीकांची भेट घेतली. त्यावेळी एका दहा वर्षांच्या मुलीला पुढील उपचारासाठी बिर्ला हॅास्पीटलमध्ये हालवण्याची व्यवस्था करून होणाऱ्या बिलाची रक्कम महानगरपालिकेने अदा करावी, अशी मागणी केली. त्यास पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. सुदैवाने रुग्णालयात दाखल नागरीक सुखरूप आहेत.















