न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२३) :- पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपयांची सरकारी मदत कायम ठेवतानाच आता दुसरे अपत्य मुलगी असेल तर महिलांना अधिकचे सहा हजार रुपये राज्य सरकार देईल.
पंतप्रधान मातृवंदना योजना-२ लागू करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य असेल. विभागाने सोमवारी केली. मातृवंदना एक या योजनेत तीन टप्प्यांमध्ये पाच हजार रुपये दिले जात असत. आता हे पाच हजार रुपये दोन टप्प्यांतच दिले जातील.
कुणाला मिळेल लाभ?…
● ज्या महिला कौटुबिक उत्पन्न प्रति वर्ष आठ लाख रुपयेपेक्षा कमी आहे तसेच किमान १८ वर्षे व कमाल ५५ वर्षे वय असलेल्या महिलांसाठी योजना.
■ दुसरे अपत्य झाले आणि त्यात दोन्ही मुली असतील किंवा एक मुलगी एक मुलगा झाला तरी एकाच मुलीसाठी लाभ दिला जाईल.















