- महावितरणकडून परिसरात दोन स्विचिंग स्टेशनची उभारणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२३) :- आकुर्डी परिसरातील दत्तवाडी, विठ्ठलवाडी, सह्याद्री कॉलनी, टेलको कपूर सोसायटी परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरु होता.
याबाबत राष्ट्रवादीचे इखलास सय्यद, मनसेचे के.के. कांबळे आणि जनाधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख आदींनी महावितरणकडे विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन महावितरणने परिसरात दोन स्विचिंग स्टेशन (Switch centre – Ring main Unit) बसवले आहेत.
ते कार्यरत करण्याची प्रक्रिया आकुर्डी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जाधव व सहाय्यक अभियंता देशपांडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर सुरू आहे. हे दोन्ही युनिट कार्यरत झाल्यानंतर विद्युत पुरवठा नियमितपणे सुरु राहील. त्यामुळे नागरिकांची वीज समस्येतून सुटका होईल, अशी माहिती जनाधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख यांनी दिली.















