न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२३) :- पाच ते सहा महिन्यांपुर्वी कानाखाली मारल्याच्या कारणावरुन नऊ जणांच्या टोळक्याने फिर्यादीच्या मुलाला शिवीगाळ केली. संगणमताने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांचा मुलगा व त्याचा मित्र या दोघांवर चाकु, कोयता व सिमेंन्टचा गट्टू याने मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये जखमी २३ वर्षीय आकाश धूनघव या फिर्यादीच्या मुलाच्या मित्राचा मृत्यू झाला.
ही घटना (दि. ११) रोजी रात्री १०.१५ च्या सुमारास जिवलग सोसायटी, ओटा स्कीम, निगडी येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी १) शाहिद ऊर्फ काळ्या जावेद पठाण, २) डोरेमॉन ऊर्फ सुरज नागनाथ चंदनशिवे, ३) शाहनवाज ऊर्फ शान्यासाजीद शेख, ४) जावेद चाँद शेख, ५) शाहीद साजीद शेख व इतर ४ इसम यातील निष्पन्न आरोपी ६) आवेश ऊर्फ भुऱ्या महमद यासीन यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी ५८८/२०२३ भा.दं.वि. कलम ३०२, ३०७, ३२६, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी क्र १, ३, ४, ६ अटक आहेत . पोउपनि गिरी गोसावी पुढील तपास करीत आहेत.















