न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२३) :- भाडेकरुकडे भाडे मागण्यासाठी फिर्यादी गेले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या जागेशेजारी त्यांचा मोठा भाऊ आणि भावाचा मुलगा त्यांना दिसला. त्यावेळी फिर्यादी त्यांना गावाकडील जागेची कधी वाटणी करायची, असे म्हणाले. त्यावेळी फिर्यादीच्या मोठ्या भावाने त्यांना शेजारी असलेल्या दुसऱ्या भावाकडे नेले. मोठ्या भावाने आरोपी क्र १ यांना फिर्यादी गावाकडील जमीनीसंदर्भात वाटणी मागीत असल्याबाबत सांगीतले. त्यावेळी आरोपी क्र १ हे फिर्यादीला तुझ्या चिंचवड येथील जागेत आम्हाला हिस्सा दे, म्हणाले. फिर्यादी त्यांना त्यामध्ये तुमचा काही एक संबंध नाही, ती मी स्वतः खरेदी केलेली आहे, असे म्हणाले. त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीला ‘जा, तुला जागा देत नाही, तुला काय करायचे आहे ते कर’, असे म्हणत फिर्यादिला शिवीगाळी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याच ठिकाणी हजर असलेला आरोपी क्र १ चा मुलगा आरोपी क्र २ याने देखील फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादी त्यास तुझा काही संबंध नाही, असे म्हणाले असता त्याचा त्याला राग आल्याने आरोपी क्र २ याने फिर्यादीच्या जोरात कानाखाली मारली व आरोपी क्र १ यांनी त्यांच्या वर्कशॉपमधील लाकडी बांबु आणुन जोरात फिर्यादीच्या डाव्या हातावर मारुन जखमी करुन फिर्यादीचा डाव्या हाताच्या मनगटाजवळ फ्रेक्चर करण्यास कारणीभुत झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १०) रोजी सकाळी १०.०० च्या सुमारास चव्हाण वेल्डींग वर्क्स समोरील रोडवर, प्रतिभा मोटर्स आणि पंडित पेट्रोल पंपासमोर, विवेकानंदनगर, ताथवडे येथे घडला.
फिर्यादी नंदकुमार राजाराम चव्हाण यांनी आरोपी १) बाळासाहेब राजाराम चव्हाण, २) गिरीष बाळासाहेब चव्हाण यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस ठाण्यात पोलिसांनी ९९७ / २०२३ भादंवि कलम ३२६, ३२३, ५०४,३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि लोहार पुढील तपास करीत आहेत.















