- पाच जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या न्यु थेरगाव रुग्णालयात नॅशनल सेक्युरीटी सर्व्हिसेस तर्फे कंत्राटी पध्दतीने रखवालदार, मदतनीस पदावर काम करण्यासाठी आरोपींनी ९ वी पास असल्याबाबतचा बनावट खोटा शाळा सोडल्याचा दाखला बनवुन तो फिर्यादीकडे जमा केला.
नॅशनल सेक्युरीटी सर्व्हिसेसची आरोपींनी फसवणुक केली आहे. हा प्रकार मार्च २०२३ ते आजपर्यंत घडला. दिपक सिताराम वाघ (नॅशनल सेक्युरीटी सर्व्हिस) यांनी आरोपी (१) महिला २) महिला, ३) महिला, ४) अनिल सुदाम शेळके, ५) काळुराम केशव ओव्हाळ यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ९९५/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि सुर्यवंशी तपास करीत आहेत.