न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२३) :- संगणमत करून स्पा सेंटरच्या नावाखाली दोन पिडीत महिलांना आरोपींनी पैशांचे अमिष दाखवले. त्यांना स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली प्राप्त करून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागवली.
पोलिसांच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाने (दि. ११) रोजी सायंकाळी ६.२० च्या सुमारास RAYA AYURVEDA SPA, व्हिजन वन मॉल, वाकड येथील प्लायवुडमध्ये बनवलेल्या रुममध्ये कारवाई केली.
पोलिसांनी १) प्रदिप ऊर्फ जानवी शंकर जाधव (स्पा मॅनेजर), २) प्रशांत रामचंद्र सोनवणे (स्पा चालक मालक), ३) सचिन रतन केदारी (स्पा चालक मालक) यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात ९९१/२०२३ भा.द.वि. कलम ३७० (३), ३४ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. सपोनि लोहार पुढील तपास करीत आहेत.















