- सुदुंबरेतील श्री. संताजी महाराज जगनाडे संस्थेकडून विद्यार्थ्यांचा होणार विशेष सत्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२३) :- सुदुंबरेतील श्री. संताजी महाराज जगनाडे या तेली संस्थेच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दहावीमध्ये ८० टक्के आणि इयता १२ वी मध्ये ७५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या (उदा. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू इत्यादी) विद्यार्थ्यांचा यात समावेश असणार आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार श्री. संत संताजी महाराज पुण्यतिथी सोहळ्यामध्ये (दि.०९ जानेवारी २०२४) रोजी श्रीक्षेत्र सुदुंबरे या ठिकाणी करण्यात येणार आहे.
त्यासाठी समाजातील संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि पालकांचा पूर्ण पत्ता, मोबाइल नंबर आदी माहिती दि. ३० नोव्हेंबर २०२३ पूर्वी संस्थेचे शिक्षण समिती चिटणीस पंडित पिंगळे यांच्याशी मोबाईल नंबर ९१५८००१३११ वर संपर्क साधून जमा करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शिवदास उबाळे आणि मुख्य चिटणीस अॅड. राजेश येवले यांनी केले आहे.











