न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२३) :- वाल्हेकरवाडी येथे लोढा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे (दि. १५) रविवारी डॉ. अश्विनी पटेल व डॉ. रजनी चौधरी यांनी सर्व वैद्यकीय सुविधा सहित रुग्णालय सुरु केले.
आमदार अश्विनी जगताप व सा. कार्यकर्त्यां तृप्ती देसाई यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ सोहळा दिमाखात पार पडला. आमदार जगताप यांनी महिला सक्षमीकरणाबद्दल बोलत असताना महिलांना उच्च पद्धतीचे वैद्यकीय उपचार माफक दरात उपलब्ध या हॉस्पिटल मध्ये अशी ग्वाही दिली. तर महिला सा. कार्यकर्त्यां तृप्ती देसाई यांनी आजही समाजात होत असलेली भ्रूण हत्ते बद्दल चिंता व्यक्त केली. आपण 21 व्या शतकात येऊन पन स्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. हे योग्य नाही असे वक्तव्य केले.
यावेळी मा. नगरसेवक शेखर चिंचवडे, मा. नगरसेवक राजेंद्र साळुंखे, आबा वाल्हेकर व महिल्या आघाडी नेत्या पल्लवी वाल्हेकर, डायरेक्टर प्रियांश पटेल, सहायक ओमप्रकाश चौधरी, डॉ अशोक लोढा, गौतम लोढा, भास्कर तात्यासाहेब आहेर आदि उपस्थित होते.











