न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २७ एप्रिल २०१९) :- पुण्यातून कोकणात सहलीसाठी निघालेली खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हीणी घाटातील पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात २ जण ठार झाले तर बसमधील इतर २४ जण जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला. ठार झालेले दोघे एकाच कुटुंबातील असून एक महिला आणि पुरुषाचा यात समावेश आहे.
संजिवनी निवृत्ती साठे (वय. ५५, रा. डी. पी. रोड औंध) ही महिला जागीच ठार झाली आहे. तर आणखी एक पुरुषाचा मृत्यू झाला. पुनम योगेश लांडे (वय. ३४), हर्षवर्धन योगेश लांडे (वय. ७), दक्ष जाधव, रियांश जाधव, ऋषा जाधव, ऋषिकेश कोंढाळकर, शितल विशाल काळे, विशाल शिवाजी काळे, लौकिक विशाल काळे, स्मिता विलास सुर्यवंशी, रेश्मा प्रशांत जाधव, पुष्पा कोंढाळकर, बाळासाहेब पवार, तनिष्का गोफणे, माणिक काळे, निवृत्ती साठे, अनघा जाधव, अनिल पवळे, प्रभा पवार, योगेश पाठक, विधीता जाधव, श्रावणी पाठक आणि बसचालक अशी जखमींची नावे आहेत.
काही जणांवर मुळशी, औंध आणि पौड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.











