न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ एप्रिल २०२४) :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विविध प्रकारचे अॅप तयार केले आहेत. यामध्ये उमेदवारांची एकूण संपत्ती, त्यांच्यावरील गुन्हे या सर्व प्रकारची माहिती देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ‘नो युवर कॅण्डिडेट’ या अॅपद्वारे उमेदवारांची संपूर्ण कुंडली मतदारांना समजणार आहे. तसेच, विविध अॅपवर निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपमुळे निवडणूक विभागाच्या मनुष्यबळावरील ताण कमी होत आहे. निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा अॅप’च्या माध्यमातून उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते विजयाचे प्रमाणपत्र मिळेपर्यंत सर्व माहिती मिळते. प्रचार सभा, प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची परवानगी, सभेसाठी जागेची परवानगी यासह विविध परवानग्या घेण्यासाठी एक खिडकी योजनेसह ‘सुविधा अॅप’ची निर्मिती करण्यात आली आहे.
माहितीची पडताळणी केली जाणार…
‘नो युवर कॅण्डिडेट’ या अॅपवर उमेदवाराची सर्व माहिती अपलोड केली जाणार आहे, ‘एन्कोर अॅप’ या अॅप्लिकेशनद्वारे उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज, प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सोय केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आलेले उमेदवारी अर्ज स्वीकृत, अस्वीकृत करणे, झालेल्या मतदानाची डिजिटल स्वरूपात माहिती संकलित करणे आदी कामे या अॅपमार्फत केली जाणार आहेत. विशेष म्हणने त्यावर माहितीची पडताळणी केली जाणार आहे.
‘नो युवर कॅण्डिडेट’ या अॅप्लिकेशनद्वारे उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्ता आदीची माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे. उमेदवाराविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. ‘व्होटर हेल्पलाइन’ या अॅपद्वारे नागरिकांना मतदार यादीतील मतदारांचे नाव शोधणे, मतदार नोंदणीचे अर्ज दाखल करणे, मतदान केंद्रांची माहिती आदी सुविधा उपलब्ध होते.
प्रचारसभा व निवडणूक विभागाच्या मनुष्यबळावरील ताण कमी होत आहे. निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा अॅप’च्या माध्यमातून उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते विजयाचे प्रमाणपत्र मिळेपर्यंत सर्व माहिती मिळणार आहे.
विठ्ठल जोशी, सहायक आयुक्त महापालिका…