न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२४) :- तळेगाव दाभाडे पोलिसांनी शुक्रवारी (दि. २६) पहाटे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ केले. यामध्ये पोलिसांनी भल्या पहाटे ४० हिस्ट्रीशीटर, तडीपार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून बंधपत्र भरून घेतले.
लोकसभा निवडणुका शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी कुरापती गुन्हेगारांची कुंडली काढली आहे. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवले आहे.
दरम्यान, शुक्रवारी पहाटे तीन ते सहा या कालावधीत तळेगाव दाभाडे पोलिसांनी हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यामध्ये पोलिसांनी ४० गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्या गुन्हेगारांकडून बंधपत्र भरून घेण्यात आले आहे. दोन संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. एकाकडून कोयता शस्त्र जप्त केले. मतीन अकबर कुरेशी याला याप्रकरणी अटक करण्यात आली