न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२४) :- पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ तसेच लोणावळा येथील नागरिकांना पक्के वाहन परवाने देण्यासाठी मे महिन्यात दौऱ्याचे आयोजन केले आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे मे महिन्यात गुरुवार ((दि. २ व ३); मंचर (दि. ६ व ७); जुन्नर (दि. १५ व १६); वडगाव मावळ (दि. २० व २१), तर लोणावळा येथे (दि. २७ व २८) रोजी शिबिराचे आयोजन केल्याची माहिती पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.
पक्क्या वाहन परवान्याचा (पक्क्या अनुज्ञप्ती) कोटा मंगळवार (दि. ३०) सायंकाळी पाच वाजता उपलब्ध होणार असून, ज्यांना वाहन परवाना घ्यायचा आहे, त्यांनी स्लॉट बुक करावा, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.