न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२४) :-घर बांधण्यासाठी फिर्यादीला लोन रक्कमेची आवश्यकता होती. व्हीराईज फायनान्स एजंटच्या मार्फत रक्कम रुपये १,६६,५०० रु. इतके कर्ज सन २०२३ मध्ये फिर्यादीने घेतले होते. लोन क्लोज करुन एनओसी देण्यासाठी फिर्यादी यांनी व्हीराईज फायनान्सच्या एजंटच्या स्कॅनरवर १,२८,९६० रुपये (एक लाख अठ्ठाविस हजार नउशे साठ रुपये) हे वेळोवेळी ऑनलाईन पाठविले.
दरम्यान त्याने कोणत्याही प्रकारची रक्कम लोन क्लोजिंग करीता व्हीराईज फायनान्स मध्ये न भरता व फिर्यादीला सदर लोनची एनओसी न देता फिर्यादीची फसवणुक करुन सदर रक्कम स्वत:साठी वापरुन त्या रक्कमेचा अपहार केला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.२६/०३/२०२४ ते आज पर्यंत) कोर्टयार्ड मॅरीयट हॉटेल, एच पी चौक, महाळुंगे फिर्यादी काम करत असलेल्या ठिकाणी घडला. फिर्यादी जयदिप सुदाम गोगावले यांनी आरोपी तुषार रामदास शिंदे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी २७१/२०२४ भादवि कलम ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा गाडीलकर तपास करीत आहेत.