न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२४) :- नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात युनिकॉर्न या दुचाकीवरून आलेल्या इसमाने क्राईम ब्रांच नवी सांगवी पोलीस चौकीमधील पोलीस असल्याची बतावणी केली. गाडीवर महाराष्ट्र शासन असे लिहले. पोलीस असल्याचे भासवण्यासाठी पोलीसांचा लोगो व नाव असलेले किचन वापरुन वेगवेगळया दुकानामध्ये जाऊन दुकानामधुन वेगवेगळया वस्तु खरेदी केल्या. पेमेंट न करता मोबाईलमध्ये फोन पे अॅप मध्ये निकनेमच्या जागी दुकानचे नाव टाकुन स्वतःच्या अकाऊंटमध्येच पैसे पाठवुन पेमेंट झाले असल्याची स्क्रिन तयार करुन दाखवली. फिर्यादी व इतरांची एकुण १०,३२० रुपयांची आर्थीक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
डिसेबर २०२३ पासुन ते आजपर्यंत हा प्रकार सुरु होता. फिर्यादी सुरेशलाल मिस्त्रीलाल खिंवसरा (वय ६२ वर्षे, धंदा कापड व्यवसाय) यांनी आरोपी अमोल आबासाहेब कायगुडे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी १७४/२०२४, भा.दं. वि. कलम ४०६, ४२० १७० प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोउपनि कणसे तपास करीत आहेत.