न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२४) :- मोबाईल फोनद्वारे अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना स्कॉईप अॅप डाऊनलोड करण्यास सांगुन आयडी बनवण्यास सांगितला. फिर्यादी यांनी आयडी तयार करून तो त्यांना शेअर केला. फिर्यादी यांना स्कॉईप अॅपवर जॉईन करून घेतले. वरून आपणा विरूध आपल्या मोबाईलवर लखनौमध्ये तीन अकॉउन्ट उघडुन त्यावर मनी लॉन्ड्रींग क्रिमीनल अॅक्टीव्हीटी चालु आहे. तुम्ही खोटे बोलत आहात. असे सांगुन फिर्यादीस आधार कार्ड, डेबीट कार्ड, नेट बेकींग डिटेल लॉगिंन पासवर्ड याची सॉफ्ट कॉफी मागितली.
आपण मनी लॉन्ड्रींग केस मध्ये आहात. जो पर्यंत हे इन्व्हेस्टीगेशन सुरू आहे तो पर्यंत आपण नॅशनल सीक्रेट रूल नुसार कोणाशीही काहीही बोलु शकत नाही, असे सांगुन फियादी यांच्या कडुन इंटरनेट बँकिंगव्दारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातुन एकुण १२,००,००० रुपये रक्कम स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेत फिर्यादीची फसवणुक केली, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २१) रोजी स. ०९/०० ते (दि. २२) रोजी स. १०.०० वा.चे दरम्यान फिर्यादीच्या राहते घरी शिवार गार्डन, रहाटणी येथे घडला. घटनेनंतर फिर्यादी (स्वॉफ्टवेअर इंजिनिअर) यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ५४०/२०२४ भा.द.वि. कलम ४०६, ४१९, ४२० सह माहिती तत्रंज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ सी, ६६डी, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोनि विठठल साळुंखे तपास करीत आहेत.