न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२४) :- धडक घेवुन स्वत:आत्महत्या केल्याची माहिती मयत हुजुर महंमद सैय्यद (वय ३२ वर्षे) याच्या पत्नीने पोलिसांना दिली. मात्र, सदर इसमास झालेली जखम, घटनास्थळावरील परिस्थिती, मयताची स्थिती व त्याच्या मुलीने कथन केलेल्या माहितीवरुन आरोपींनी मयताचा खुन केला असावा, असा संशय पोलिसांना आला.
एकंदरीत परीस्थिती पाहता मयताची पत्नी आरोपी क्र १ हीने घटनास्थळावरील रक्त साफ केले होते. त्यास झालेल्या जखमांची स्थीती पाहता ती धडक घेवुन आत्महत्या करणे अशक्य आहे. त्यास कोणत्यातरी हत्याराने वार करुन खुन केल्याचे दिसुन येत आहे. मयताच्या मुलीच्या जबाबवरुन त्यास त्याची पत्नी आरोपी क्र १ व भाऊ आरोपी क्र २ यांनी संगनमत करून खुन करुन हत्याराची हरप्रकारे विल्हेवाट लावुन दिली असावी, असा पोलिसांना संशय आहे.
हा प्रकार (दि. २८) रोजी रात्री ११.४७ च्या पुर्वी मयताच्या राहत्या घरी ब्लुम रेसेडन्सी समोर, थोरवे वस्ती, च-होली खु. ता. खेड, जि. पुणे) येथे घडला आहे. आरोपी १) २८ वर्षीय महिला, २) फिरोज महंमुद सैय्यद (वय ३८ वर्षे, रा. मु.पो. मासाला खु., ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात १२९/२०२४ भा.दं.वि कलम ३०२,२०१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि साळी पुढील तपास करीत आहेत.