- देहूतील गाथा मंदीर बायपास परिसरातून सव्वादोन लाखांच्या चाकांची चोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२४) :- मोकळया मैदानात लावलेली ट्रेलर गाडी ही चॅशी आणि व्हॅक्यम टॅक माउंटिंगच्या कामासाठी तीन महिन्यापासुन फिर्यादीच्या कंपनीत होती. गाडी लॉक करुन पार्क केलेली असताना अज्ञात चोरटयाने, अप्रामाणीकपणे, चोरीच्या उददेशाने देहुगांव येथिल कंपनीच्या पाठीमागे लावलेल्या मोकळया जागेतुन गाडीचे २,२५,००० रुपये किंमतीचे एकुण ९ व्हील रिमसह टायर चोरुन नेले आहेत.
हा प्रकार (दि. २५ एप्रिल) रोजी सकाळी ९.०० पुर्वी मास्टर फॅब्रीकेटर्स इंडीया, गाथा मंदीर बायपास रोड, देहुगांव येथे कंपनीच्या मोकळया जागेत घडला.
फिर्यादी संदीप सुरेद्र शिंदे (वय २९ वर्ष धंदा व्यवसाय) यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलिसांनी २४८/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा पवार तपास करीत आहेत.