- तीन देशी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसं जप्त; तीघजण ताब्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२४) :- पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन करून तिघांनी विनापरवाना, बेकायदेशीरपणे तीन देशी बनावटीचे गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुस स्वतःजवळ ठेवले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे आणि आळंदी पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पहिली कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ५ ने (दि.३०/०४/२०२४) रोजी ००.३० वा. चे सुमारास नथुभाऊ भेगडे शाळेच्या पाठीमागे, एंजल हिल्स सोसायटी, तळेगाव दाभाडे येथे कारवाई केली. दोघांकडून ८०,०००/ रु किं चे ०२ देशी बनावटीचे गावठी पिस्टल व ४,०००/- रु किं चे ०४ जिवंत काडतुस असे एकुण ८४,०००/- रु किं चा मुद्देमाल जप्त केला आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी २६५/२०२४भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महा पो का. क. ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करीत त्यांना ताब्यात घेतले आहे. पोउपनि इंगळे तपास करीत आहेत.
दुसरी कारवाई (दि. ३०) रोजी दुपारी २.०० वा. चे सुमारास मरकळ येथील मकरळ ते तुळापुर रोडवर गुन्हे शाखा युनिट ३ ने केली. आरोपी गणेश तुकाराम पवार (वय २५ वर्षे, रा. मरकळ) याने आपल्या कब्जामध्ये ०१ देशी बनावटीचे पिस्तुल, व १ जिवंत काडतुस विनापरवाना बेकायदेशीररित्या बाळगले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत ५१,००० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी १३१/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि लोहार तपास करीत आहेत.