न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२४) :- दरवर्षी १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त सुदुंबरे येथील सिद्धांत कॉलेजमध्ये भारतीय मजदुर संघ संलग्न सिद्धांत कामगार संघटनेच्या नामफलकाचे पूजन करण्यात आले.
यावेळी भारतीय मजदूर संघाचे प्रतिनिधी दतात्रय गाडे, विशाल काळडोके, धनाजी गाडे, दौलत कुऱ्हाडे, अयुब शेख तसेच सर्व सभासद बाबा गाडे, बाळू गाडे, गणेश जंबुकर, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
१ मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील ८० पेक्षा अधिक देशात साजरा केला जातो. कामगारांच्या हक्कासाठी उभारलेल्या लढ्यामुळे जगभरात एक नवी क्रांतीच सुरू झाली. सन १८८६ साली उद्योगात १२ तासांहून अधिक काळ राबवणाऱ्या कामगारांसाठी हा लढा सुरू झाला आणि त्यात मिळालेल्या यशाचं प्रतीक म्हणून जगभरात १ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती यावेळी उपस्थितांनी दिली.