न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२४) :- कॉलेजला जाता येता ओळख झालेल्या तरुणाने फिर्यादीच्या मुलीचा विनयभंग केला होता. दरम्यान फिर्यादी व त्यांची पत्नी व तीन मुली व मुलगा हे सर्वजण घरामध्ये असताना आरोपी हा खालून फिर्यादीच्या गॅलरीमध्ये बघत होता. फिर्यादी व मुलगी हे खाली गेले. आरोपी तरुण हा मुलीला काहीतरी करेल म्हणून त्याला सर्वांनी पकडले.
फिर्यादीसह त्यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी असे मिळून सर्वांनी त्यांच्या फोरव्हिलर स्विफटमध्ये आरोपी तरुणाला घालून पोलीस ठाण्यात निघाले होते. तेवढ्यात तरुणाने त्याच्याजवळील एक लोखंडी कटर काढून ते कटर फिर्यादीच्या मुलीच्या गळयाला लावून ‘तुला चिरून टाकतो’ असे म्हणत तिला धमकावून तिला कटरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार बघून फिर्यादीने गाडी रस्त्यावर थांबविली. नंतर मुलगी ही दुस-या मुलीला वाचवायला लागली. त्यावेळी आरोपीने त्याच्या हातातील कटरने फिर्यादीच्या पहिल्या मुलीच्या डाव्या हाताला कोप-याजवळ मारून तिला गंभीर दुखापत केली. तेवढयात फिर्यादी हे सुध्दा मुलीना वाचवायला गेले असता आरोपी याने त्याच्या हातातील कटरने फिर्यादीच्या गळयाच्या डाव्या बाजूस मारून फिर्यादीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याने ते कटर फिरवत फिर्यादीच्या पत्नीच्या गळयाला तसेच हाताला मारून तिला सुध्दा जखमी केले. त्यानंतर त्याच्या हातातील कटर ताब्यात घेत असताना ते कटर फिर्यादीच्या उजव्या हाताच्या करंगळीला लागून जखम झाली आहे, असं फिर्यादीत म्हटल आहे.
हा प्रकार गेली एक वर्षा पासून तसेच दि. २९/०४/२०२४ रोजी रात्री ८.३० वा ते ८.५० च्या दरम्यान अमुल्यम सोसायटी, डुडूळगांव व वडमुखवाडी बस स्टॉपजवळ, केके हॉस्पीटलचे समोर, आळंदी ते पुणे सार्वजनिक रोडवर, च-होली बु// याठिकाणी घडला आहे.
फिर्यादी बाळासाो शामराव पाटील (वय ५० वर्षे) यांनी आरोपी कृष्णा बाळासाहेब काळे (वय २८ वर्षे, रा. मोहितेवाडी, शेलपिंपगांव, ता. खेड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी २०४/२०२४ भा.दं.वि कलम ३०७,३२६, ३२४,५०६,५०४,३५४(४) प्रमाणे गुन्हा दाखल करीत माथेफिरू तरुणाला अटक केली आहे. पोनि अंभोरे पुढील तपास करीत आहेत.