न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मे २०२४) :- २९ वर्षीय तरुणीचे तरुणाशी लग्न ठरले होते. त्यांचा कुंकुमतिलकाचा कार्यक्रम देखील झाला होता. दरम्यान कार्याक्रमाचे फोटो व्हॉटसअॅप स्टेटसला आरोपीने ठेवले होते. परंतु, आरोपीचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. त्याबाबत फिर्यादी यांची बहिण व फिर्यादी यांना त्याने माहीती दिली नाही. नंतर लग्न करायचे नाही असेही आरोपीने सांगितले.
त्यामुळे फिर्यादीची बहिण हिने आपली गावात व समाजात इज्जत गेली व आपले आयुष्य बरबाद झाले, असे मनास वाटुन घेऊन राहत्या घरी खोलीच्या छतास असलेल्या लोंखंडी ऐगलला साडीने गळफास घेतला. तिला आरोपीने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे, असं फिर्यादीत म्हंटल आहे.
ही घटना (दि.०२ रोजी रात्री ११.१५ च्या दरम्यान फिर्यादी यांच्या राहते घरी, वराळे ता मावळ जि पुणे येथे घडली. फिर्यादी विनायक संभाजी मराठे (वय ३० वर्षे) यांनी आरोपी विकास राजाराम धामनकर (वय ३० वर्षे रा. स्वराज्यनगरी समोर, तळेगाव चाकण रोड, तळेगाव) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी १०७/२०२४ भादवि कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सपोनि मस्के तपास करीत आहेत.