न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मे २०२४) :- अज्ञात व्यक्तीने कनेक्शनसाठी मोबाईल नंबरवरुन फिर्यादीला फोन केला. तुम्हाला कंपनीच्या website वर तुम्ही २९९ चा प्लॅन भरा असे सांगितले. त्यांनतर फिर्यादी यांनी पेंमेट साठी credit card चे details भरले. पण त्यावेळी फिर्यादी यांचे पेंमेंट झाले नाही.
त्यानंतर फिर्यादी यांनी दुसऱ्या बँक अकाऊंटवरुन पेंमेंट केले असता ते पण झाले नाही. त्यांनतर फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर मेल आला की credit card वरुन ६६,००७ रुपये रक्कम ही खातेतुन कट झाले. तसेच दुसऱ्या बँक खातेमधुन ४०,५००/- रु अशी एकुण फिर्यादी यांची १,०६,८०६ ऑनलाईन पध्दतीने आर्थीक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि १२/०८/२०२२) दरम्यान, फिर्यादी यांच्या राहते घरी घडली. फिर्यादी अक्षय कारभारी पटारे (वय ३५ वर्षे) यांनी आरोपी jio fibar internet वरील अनोळखी इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी १८४/२०२४, भा.दं. वि. कलम ४०६,४२० सह माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) प्रमाणे अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. पोनि तांबे पुढील तपास करीत आहेत.