- पथदिवे असूनही दाट अंधार; प्रसंगी अपघाताचाही धोका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०८ मे २०२४) :- देहू नजीकच्या सुदुंबरे परिसरातील भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे भव्यदिव्य बांधकाम सुरु आहे. ते पाहण्यासाठी आणि महाराजांच्या दर्शनासाठी नियमित भाविक मोठ्या संख्येने भंडारा डोंगराला भेटी देत असतात.
रात्रीची सोय म्हणून इथे पथदिवे उभारले आहेत. मात्र हे सर्व पथदिवे बंद अवस्थेत आहेत. सायंकाळ झाल्यानंतर इथे मोठया प्रमाणार अंधार होतो. त्यामुळे डोंगरावर जाणाऱ्या आणि उतरणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.
कदाचित अपघाताचा देखील धोका आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथील पथदिवे सुरु ठेवावेत, अशी मागणी भाविक भक्त करीत आहेत.