न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (वार्ताहर) (दि. ०८ मे २०२४) :- मावळ लोकसभा क्र.३३ मधील २०४ मावळ विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दाभाडे महसूल हद्दीत कोटेश्वरवाडी- १ व शेलारवाडी-२ धरून एकूण ६३ मतदान केंद्र असून यामध्ये एकूण मतदान ६२३२१ एवढे असून पुरुष मतदार ३२२६४ तर महिला मतदार ३००५७ असल्याची माहिती तळेगाव दाभाडे मंडल अधिकारी बजरंग मेकाले यांनी दिली.
१३ मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार असून मतदान केंद्रावरील सर्व तयारी पूर्ण होत असल्याचे चित्र दिसत आहे. मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे हे गाव मोठी मतदार संख्या असलेलं गाव म्हणून ओळखले जाते. यामध्ये एकूण ६० मतदान केंद्र असून त्यामध्ये अनुक्रमे मतदान केंद्र, शाळेचे ईमारतीचे नाव, ईमारतीमध्ये असलेली मतदान केंद्र संख्या, एकूण मतदार पुढीलप्रमाणे आहेत…
१) सरस्वती विद्या मंदिर शाळा तपोधाम कॉलनी वराळे रोड, केंद्र ६ ,संख्या ५६९६ २) इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव चाकण रोड , केंद्र ८ ,संख्या ७२११ ३) संत ज्ञानेश्वर प्रा.शाळा (गुलाबी शाळा), केंद्र ९ ,संख्या ८९३१ ४) नवीन समर्थ विद्यालय (नूतन), केंद्र ३ ,संख्या ४०४३ ५) लोकमान्य टिळक प्रा. शाळा क्र.६ (गावात बाजार), केंद्र ७ ,संख्या ६४४०, ६) वीर जिजामाता कन्या शाळा क्र. ५, केंद्र ८,संख्या ७५५९ ७) थोर समाज सेवक नथुभाऊ भेगडे शाळा क्र. १, केंद्र १०,संख्या १०४८३ ८) सुभाष चौक जुनी भाजी मंडई, केंद्र ४,संख्या ४२०७ ९) गणेश मोफत वाचनालय शाळा चौक, केंद्र २ ,संख्या २०३३ १०) चावडी चौक (तलाठी कार्यालय), केंद्र २ ,संख्या १४०२ ११) कैकाडी समाज मंदिर (भेगडे आळी),केंद्र १ ,संख्या १३४१ (फक्त तळेगाव दाभाडे हद्दीत एकूण मतदान केंद्र – ६० , मतदार संख्या – ५९३४६ अशी आहे.)