न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२४) :-मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. कर्जत तालुक्यातील चौक येथील आगरी सेनेने संजोग वाघेरे यांना पाठींबा जाहीर करत विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत आणि महाविकास आघाडीला अनेक संस्था, संघटनांचा पाठिंबा मिळत आहेत. त्यांनी दिलेले उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची विनम्र, संवेदनशील आणि लोकांच्या हाकेला धावून जाणारे राजकारणी म्हणून ओळख आहे. म्हणूनच पिंपरी, चिंचवड, मावळ विधानसभेसह रायगड जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातून पाठबळ मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील आगरी व बहुजन अल्पसंख्याक जमातीचा समूह आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे. त्यामुळे संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या बाबत आगरी सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख व महाराष्ट्र प्रदेश सदस्य सचिन एकनाथ मते यांच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे.
आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी, आगरी सेना नेते प्रदीप साळवी, युवा आगरी सेनेचे राहुल साळवी यांच्या आदेशाने मावळ लोकसभा मतदार संघात जोमाने काम करीत आहे. तसेच, आगरी सेनेच्या वतीने उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे “मशाल” चिन्ह घराघरात पोहोचवणार असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.