न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२४) :- जुन्या भांडणाचा राग मनात धरुन चौघांनी फिर्यादीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहान करून शिवीगाळ दमदाटी केली. तसेच आरोपी क्र १ याने शर्टात ठेवलेली लोखंडी पालघन काढुन फिर्यादीच्या डाव्या पायाच्या मांडीवर उलटी मारली. तसेच तीच पालघन आरोपी क्र १ ने फिर्यादीचे पाठीमागुन येवुन डोक्यात मारुन गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी क्र १ ने त्याचे हातातील लोखंडी पालघन हवेत भिरकावत मोठ मोठ्याने आरडा ओरडा करत रोडवर जावुन ‘मी इथला भाई आहे’ असे मोठमोठ्याने ओरडुन तेथुन जाणा-या येणा-या लोकांमध्ये दहशत निर्माण केली, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. ०८) रात्री ०२.०० च्या सुमारास फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या समोर अंगणात, काळभोर गोठा पत्रा शेड पीसीएमसी स्कुल समोर, निगडी येथे घडला. फिर्यादी राहुल दत्ता कुदळे (वय २२ वर्षे, धंदा ड्रायव्हर रा. निगडी) यांनी आरोपी १) बबुल मोरे (रा. ओटास्किम निगडी), २) जिंतेन्द्र जाधव (रा दळवी नगर ओटास्किम निगडी), ३) अमन शेख (रा गुरूदत्त हौसा, ओटास्किम निगडी), ४) शेखर माने (रा.राज नगर ओटास्कीम निगडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी २४१/२०२४ भा.दं.वि कलम ३०७,३४, आर्म अॅक्ट ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे १३५ सह. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुत्नाळे पुढील तपास करीत आहेत.