न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२४) :- घरफोडी करण्याच्या उददेशाने शेजाऱ्याच्या घराच्या दरवाजाचा लोखंडी कडी कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. शेजारी राहणाऱ्या दोघांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याच्या हातातील पिस्टलने हवेत एक राउंड फायर केला. आवाजामुळे फिर्यादी व इतर दचकले व पुन्हा त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच संधीचा फायदा घेत त्या ठिकाणावरून ते दोघेही अनोळखी इसम दुचाकीवरून पळ काढून निघन गेले.
ही घटना (दि.०९) रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे घडली. शाम राजाराम शिंदे (वय ५७ वर्ष) यांनी आरोपी १) एक अनोळखी इसम (अंदाजे ४० ते ४५ वर्ष), २) एक अनोळखी इसम (अंदाजे ३५ ते ४० वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी २८४/२०२४भा.दं.वि कलम ४५५,३८०,५११,३४ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), (२७) मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१)१३५ दोघांच्या वरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि यमगर पुढील तपास करीत आहेत.