न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे २०२४) :- गहुंजे येथे पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा शनिवारी सायंकाळी पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाऊस चालू असतानाच बचाव पथकाच्या तरुणांनी पाण्यात शोध घेऊन रात्री त्याच्या मृतदेहाला पाण्याबाहेर काढले.
निखील ओमप्रकाश यादव (वय १६ रा. देहूरोड) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील हा देहूरोड येथील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत होता.
सध्या शाळांना सुट्टी असल्याने तो शनिवारी चार वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी तो मित्रासमवेत गहुंजे येथे पवना नदीवर आला होता. तेथे पोहण्यासाठी पाण्यात उतरला. परंतु त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने व त्याला चांगले पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.











