- देहू नगरपंचायतीने होर्डींग्जधारकांना बजावल्या नोटीसा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १८ मे २०२४) :- देहू नगरपंचायतीच्या हद्दीत असलेले अनधिकृत होर्डिंग्ज २४ तासात काढून घेण्याची नोटीस संबंधितांना देहू नगरपंचायत प्रशासनाने दिल्या आहेत. एकूण नऊ जणांचा यात समावेश आहे.
देहूत दररोज भाविक येत आहेत. तसेच जून महिन्यात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा असून सोहळ्यानिमित्त भाविकांची गर्दी होणार आहे. त्यातच पावसाळा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले आहेत.