न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२४) :- १५ वर्षीय मुलगा हा मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी जात होता. दरम्यान फिर्यादीच्या शेजारील बिल्डींगमध्ये राहणारा मुलगा हा फिर्यादीच्या मुलाशी भांडण करीत होता. फिर्यादी व त्यांचा पुतण्या वय १३ वर्षे हे भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने खिशातील चाकू काढून फिर्यादीच्या पुतण्याच्या गळयावर वार करुन त्याला गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांना मोठमोठयाने शिवीगाळ करुन धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १७) रोजी दुपारी १.३० च्या सुमारास राष्ट्रमाता रमाई, सावित्री हौ. सोसा. बील्डींग समोर ओटास्किम निगडी येथे घडला. फिर्यादी नारायण बळीराम लोखंडे (वय ४० वर्षे धंदा-ड्रायव्हर रा. ओटास्किम निगडी) यांनी आरोपी विजयानंद आत्माराम भागवत (वय २९ वर्षे रा. सम्राट अशोका हौ. सोसा. निगडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी २५५/२०२४ भा. दं. वि. कलम ३०७, ५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. पोउपनि सातपुते पुढील तपास करीत आहेत.












