न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२४) :- तळेगाव दाभाडे हद्दीत मोठया प्रमाणात लोक वसाहत असुन विविध बँकेचे ए.टी.एम. सेंटर आहेत. अज्ञात आरोपी यांनी (दि. ०६) रोजी सायं ६:४५ वाजता ते (दि. ०७) रोजी ०५:३० च्या दरम्यान तळेगाव दाभाडे येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे ए. टी.एम. फोडुन त्याचे नुकसान केलेले होते. चोरीचा प्रयत्न केलेला होता.
दरम्यान तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (दि. १६) रोजी परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज गोळा करून ए.टी.एम. फोडुन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून ०२ गुन्हे उघड केले आहेत.
१) आसीफ सलीम शेख (वय २० वर्षे रा. गल्ली नं. ०१, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे), २) रत्नदीप रेवनसिध्द कदम (वय १९ वर्षे, रा. गल्ली नं. २३, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे), ३) अमन कमीनदंर यादव (वय १९ वर्षे, रा. गल्ली नं.०१, येवलेवाडी, कोंढवा खुर्द, पुणे), ४) विधी संघर्षग्रस्त बालक आयान आझाद खान (वय १७ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे) यांना सापळा लावुन तपास पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन गुन्हयाची उकल करून घेतलेली आहे.
आरोपी यांना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींकडे पोलीस कोठडी दरम्यान अतिशय कौशल्यपुर्ण तपास केला. आरोपी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे येथे दाखल गु.र.क. २८१/२०२४ कलम ४६१,४२७,५११ भादवि आणि देहुरोड पोलीस ठाणे दाखल गु.र.क. २६०/२०२४ कलम ४६१,३८०,५११,४२७ भादवि असे ०२ गुन्हे केल्याची कबुली तपासा दरम्यान दिलेली आहे.















