- मुंबईकडे निघालेल्या तिघा सराईतांना ताब्यात घेऊन पिस्टल मॅग्झीनसह जिवंत राउंड जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२४) :- तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (दि. २०) रोजी कारवाई करून लोखंडी पिस्टल मॅग्झीनसह ०४ जिवंत राउंड जप्त केले आहेत. १) सचिन किसन शिंदे (वय ३८ वर्षे, रा. गणपती मंदीराजवळ, लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे), २) गौरव कमलाकर शिंदे (वय २० वर्षे, रा. विठ्ठल रूक्मीणी मंदीराच्या पाठीमागे, लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे), ३) अजिंक्य दादासो म्हस्कुटे (वय २५ वर्षे, रा. विठ्ठल रुक्मीणी मंदीरापाठीमागे, खामगाव, ता. दौंड, जि. पुणे) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळया रंगाची स्कॉर्पिओ ही पुणे-मुंबई जुन्या महामार्गाने मुंबईच्या दिशेने जात असुन त्यातील इसमांकडे पिस्टल आहे. अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे पोलीस पथकाने सापळा लावुन ही गाडी घोराडेश्वर डोंगराच्या पायथ्यालगत ताब्यात घेतली.
गाडीतील आरोपी तिघांना ताब्यात घेतले. चौकशी करून सखोल तपास केला असता त्यांच्याकडे काळया रंगाचे लोखंडी पिस्टल मॅग्झीनसह ०४ जिवंत राउंड मिळुन आले. त्याप्रमाणे तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे दाखल गु.र.क. २९६/२०२४ कलम भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.
सचिन किसन शिंदे याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात दोन तर गौरव कमलाकर शिंदे याच्यावर लोणीकंद आणि चिखली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे तर अजिंक्य दादासाो म्हस्कुटे याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.












