न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२४) :- १९ वर्षीय पिडीत तरुणीने मागील दीड वर्षापासुन २४ वर्षीय तरुणासोबतचे प्रेमसंबंध पुर्णपणे तोडले. त्या कारणावरुन आरोपी तरुणाने कामावरुन घरी जात असताना महिलेला रस्त्यात आडवून हाताने मारहाण केली. तरुणीचा गळा दाबुन करुन तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे, असं फिर्यादीत म्हटल आहे.
ही घटना (दि. २७) रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास रूणाल गेटवे सोसायटीच्या पाठीमागील बाजुला, मोकळ्या रानात, किवळे येथे घडली. फिर्यादी महिलेने आरोपी आसिफ मोहम्मद शेख (वय-२४ वर्षे रा. मुकाई चौक किवळे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
रावेत पोलिसांनी २५० /२०२४ भा.द.वि.कलम ३०७, ३२३, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) सह, महा. पो.का.१९५१ चे कलम ३७ (१),३, १३५व अ.जा.ज.अत्याचार प्रतिबंधक अधि. १९८९ चे कलम नुसार गुन्हा दाखल करीत तरुणाला अटक केली आहे. सपोनि कुंभार पुढील तपास करीत आहेत.














