न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२४) :- पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन विनाकारण वाद घातला. तरुणाला वाईट-वाईट शिवीगाळ केली. त्याला खाली जमीनीवर पाडुन लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच आरोपी क्रं १ याने तेथील रोडच्या कडेला पडलेला सिमेंटचा गड्डु हाताने उचलुन तरुणाच्या डोक्यात मारहाण करुन जखमी केले आहे. हा प्रकार (दि. २७) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास मैला शुध्दीकरण केंद्र, पिंपळे सौदागर येथील सार्वजनिक रोडच्या कडेला घडला.
फिर्यादी प्रविण भारत मस्के (वय २० वर्षे) याने आरोपी १) अमोल कैलास दुणगे (वय ३३ वर्षे, रा. पिंपळे सौदागर), २) प्रलय संजय जगताप (वय ३० वर्षे रा. पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
सांगवी पोलिसांनी २३२ /२०२४ भा.द.वि कलम ३२४,३२३, ५०४. ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पो.हवा कारभळ पुढील तपास करीत आहेत.














