- बेसावध तरुणावर पाठीत दोन आणि डोक्यात एक गोळी झाडून हत्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२४) :- सांगवीमध्ये झालेली हत्या ही टोळी युद्धातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दीपक कदम असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. कदमची बुधवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात दोघांनी तीन गोळ्या झाडून हत्या केली.
आरोपी हे दुचाकीवरून पसार झाले. या हत्येची संशयाची सुई ही रेहान शेखच्या टोळीशी जोडली जात आहे. त्या दिशेने पोलीस आणि गुन्हे शाखा तपास करत असून एका संशयितला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, योगेश जगतापच्या हत्येशी काही संबंध आहे का? याचे देखील धागेदोरे तपासले जात आहेत. दीपक कदम याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
हत्या झालेला दीपक कदम हा टपरीवरून खायचं पान घेऊन घरी जात होता. तेव्हाच, बेसावध असलेला कदम याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने पाठीत दोन आणि डोक्यात एक गोळी झाडून हत्या केली. काही कळायच्या आत तेथून दोन्ही आरोपी पसार झाले.


















